Ticker

6/recent/ticker-posts

बोरीपार्धी येथे अनोळखी इसमाचा मृत्यू,ओळख पटविण्यासाठी पोलीसांनी केले नागरिकांना आव्हान



      दौंड तालुका प्रतिनिधी -कानिफनाथ मांडगे 

                         ता.५. दौंड तालुक्यातील बोरीपार्धी -धायगुडवाडी येथे अनोळखी इसमाचा मृत्यू झाला असून अद्यापपर्यंत त्याची ओळख पटली नसल्याचे यवत पोलीसांनी कळविले आहे. याबाबत अब्दुल रजाक माहीन शेख राहणार (बोरीपार्धी ता. दौंड जि. पुणे )यांनी खबर दिली की दिनांक ०२/०६/२०२५ रोजी सायंकाळी ५:३० वाजण्याचे सुमारास बोरीपार्धी गावच्या हद्दीत धायगुडेवाडी येथील नॅशनल हॉटेलमध्ये एक अनोळखी बेवारस इसम नाव पत्ता माहीत नाही वय अंदाजे ५० ते ५५ वर्ष याचे अचानक छातीत दुखत असल्याने त्यास औषध उपचार कारीता बोरीपार्धी येथील हर्ष हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले असता तेथील डॉक्टरांनी त्यास तपासून ते उपचारापूर्वीच मयत झाल्याचे सांगितले सदर इसम हा कोण माहिती नसल्याने ही खबर यवत पोलीसांना कळविली.

सदर अनोळखी इसम हा अंगाने मजबूत रंगाने काळा सावळा अंगामध्ये लाल रंगाचा हाफ बायाचा टी-शर्ट त्याच्यावर इंग्रजीमध्ये जिओ ओरिजिनल असे लिहिलेले तसेच फुल पॅन्ट आर्मी रंगाची मोरपंखी रंगाची इलॅस्टिकची अंडरवेअर नेसलेला अज्ञात इसमाची कोठे माहिती मिळाल्यास बीए गाडेकर श्रेणी पोलीस उपनिरीक्षक यवत पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधावा त्यांचा मोबाईल नंबर ९६३७५४७१२९ असे आवाहन यवत पोलीसांनी केले आहे.