अलिबाग,(रत्नाकर पाटील)
पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी आदींनी कॉंग्रेसचे नेतृत्व केले. सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी ही मंडळी सुद्धा नेतृत्वच करतेय. अनेकदा कॉंग्रेसचा राष्ट्रीय चेहरा कोण, यावर चर्चा करून हिनवताना दिसतात; परंतु ज्या कॉंग्रेसने देशात लोकशाही आणली. त्या तत्त्वानुसार कॉंग्रेसचा खरा चेहरा जनता आहे", असे मत कॉंग्रेसचे प्रशिक्षक, उत्तम वक्ते यशराज पारखी पाटील यांनी अलिबाग येथे केले. ते पुढे म्हणाले, "हा देश माझा आहे. म्हणजे या देशात राहणाऱ्या सर्वांचा मी सन्मान करीन, असा त्याचा अर्थ आहे. राजकारणाच्या एबीसीडीमध्ये नवीन आव्हाने स्वीकारायला लागतील. कॉंग्रेस कार्यकर्ता हे खूप महत्त्वाचे पद आहे. आपले विचार मोठे हवेत. महत्त्वाकांक्षा असलीच पाहिजे."
'राष्ट्रनिर्माण सोशल मीडिया', 'पक्ष संघटन सध्याची स्थिती व आव्हाने', 'कार्यकर्त्यांची जबाबदारी' या विषयावर प्रा. यशराज पारखी पाटील यांनी दोन दिवस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनावर कार्यकर्ते खूष होते. यावेळी आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनीही कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, "समाजासाठी काम करा, गरिबातला गरीब आपल्याला सर्वप्रथम दिसला पाहिजे, त्याच्या समस्या ऐका आणि सोडवण्याचा प्रयत्न करा, ते आपले कर्तव्य आहे."
यावेळी सहभागी कार्यकर्त्यांना आणि नवीन निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना महेंद्रशेठ आणि इतर मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे देण्यात आली.अलिबाग येथे रविकिरण रिसार्ट येथे काँग्रेसचे दोनदिवसीय निवासी शिबिर शनिवारी आणि रविवारी झाले. रायगड जिल्ह्यातील शेकडो युवा कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वाखाली हे शिबिर पार पडले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मार्गदर्शन करून तरुणांचे प्रबोधन केले. या शिबिराला उत्तम प्रतिसाद लाभला.
यावेळी रायगड काँग्रेसच्या प्रभारी राणी अग्रवाल, एसटी कॉंग्रेसचे श्रीरंग बर्गे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, रायगड जिल्हा महिला अध्यक्षा श्रद्धा ठाकूर, महाराष्ट्र प्रदेश फिशर मॅन अध्यक्ष मार्तंड नाखवा, रायगड जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष अखलाक शिलोत्री, माजी अध्यक्ष अलिबाग तालुका योगेश मगर, अलिबाग काँग्रेस अध्यक्ष भास्कर चव्हाण, रायगड जिल्हा युवक अध्यक्ष निखिल ढवळे, पनवेल ओबीसी सेल अध्यक्ष वैभव पाटील, सरचिटणीस रायगड जिल्हा देवेंद्र पाटील, आकाश राणे उपाध्यक्ष युवक काँग्रेस रायगड, किरीट पाटील उपाध्यक्ष रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी, राजीव पाटील पर्यावरण सेल रायगड जिल्हा अध्यक्ष, चंद्रशेखर ठाकूर माजी सदस्य कोप्रोली, लंकेश ठाकूर महाराष्ट्र प्रदेश युवक उपाध्यक्ष, अशफाक पानसरे नागोठणे काँग्रेस अध्यक्ष आदी उपस्थित होते.
Social Plugin