Ticker

6/recent/ticker-posts

मूळस हेवाळे मार्गावर मोठे झाड पडल्याने वाहतूक ठप्प



दत्ताराम देसाई@ता.प्रतिनिधी 

०४/०६/२०२५:-दोडामार्ग तालुक्यातील हेवाळे मुळस रस्त्यावर बुधवारी दुपारी भलेमोठे झाड रस्त्यावर अचानक पडल्याने गावातील मार्ग पूर्णपणे बंद झाला. गावात जाणारी सावंतवाडी हेवाळे बस येण्यापूर्वी हे झाड पडल्याने एसटी अर्ध्यावरच ग्रामपंचायत कार्यालय येथे वळवली तर हेवाळे गावात जाणारी वाहने अडकून पडली झाड पडल्याची माहिती समजतात. संदीप पाटील हेवाळे ग्रामसेवक,आदित्य देसाई,ऋषभ देसाई भाऊसाहेब देसाई नितेश सडेकर सयाजी देसाई भाऊ सडेकर रुपेश कदम संदीप नाईक यांनी व इतर गावाच्या ग्रामस्थांनी तात्काळ या ठिकाणी जाऊन परिस्थिती पाहून जेसीबी बोलून घेतला व पडलेले झाड बाजूला केले व वाहतूक सुरळीत केली.