Ticker

6/recent/ticker-posts

अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या चांदवड - देवळा मतदारसंघातील पीक-विमा धारक शेतकऱ्यांना पीक विमा



पत्रकार सागर शिरसाट @प्रतिनिधी 

आज कृषी मंत्री मा. ना. श्री. माणिकराव कोकाटे साहेब यांच्या दालनात आ. डॉ. राहुल दादा आहेर यांच्या उपस्थितीत ऑक्टोबर 2024 मध्ये अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या चांदवड - देवळा मतदारसंघातील पीक-विमा धारक शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीकडून झालेल्या चुकीच्या पंचनाम्या मुळे नुकसान भरपाई मिळण्यास येणाऱ्या अडचणीं संदर्भात बैठक संपन्न झाली..

यावेळी खरीप 2024 मध्ये ज्या शेतकऱ्यांना NDRF अंतर्गत नुकसान भरपाई मिळालेली आहे, त्यापैकी जे शेतकरी पीक विमा योजनेत सहभागी आहेत परंतु त्यांना पीक विमा मिळालेला नाही, अशा शेतकऱ्यांना NDRF अंतर्गत झालेले पंचनामे गृहीत धरून नुकसान भरपाई अदा करावी असे आदेश मा. कृषी मंत्री महोदयांनी संबंधित पीक विमा कंपनीचे अधिकारी व यंत्रणेला दिले.

यावेळी कृषी आयुक्त श्री. सुरज मांढरे, जिल्हा कृषी अधिकारी श्री. काशीद तसेच श्री. आबा गांगुर्डे, श्री. गोकुळ वाघ, श्री. विठ्ठल चव्हाण, श्री किशोर चव्हाण यांच्यासह शेतकरी व पीक विमा कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.