शिवाजीनगर कॉलनीतील घटना;कुटुंबीयांवर शोककळा
अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ
अंबड शहरातील बसस्थानकासमोरील शिवाजीनगर कॉलनीत राहणाऱ्या एका तरुण शिक्षकेतर कर्मचाऱ्याने घराच्या छताला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवार २० जून २०२५ रोजी उघडकीस आली आहे.सतीश विश्राम पाटील (वय-38)असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अंबड शहरातील शिवाजीनगर कॉलनीत सतीश पाटील राहत होते.शुक्रवारी सकाळी ते त्यांच्या घराच्या तिसऱ्या मजल्यावरील छताच्या अँगलला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.नातेवाईकांनी त्यांना तात्काळ अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.मात्र,तेथील डॉ.स्वप्नील पाटील यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती अंबड पोलिसांना कळवण्यात आली.पोलीस अंमलदार हिरामण फलटणकर आणि अशोक म्हस्के यांनी मरणोत्तर पंचनामा केला.डॉ पाटील यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.सतीश पाटील यांच्यावर दुपारी त्यांच्या मूळगावी,जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील घागर मुंदाणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,एक मुलगी,एक मोठा भाऊ,बहीण आणि भावजय असा परिवार आहे.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून,अंबड पोलिसांत या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.





Social Plugin