Ticker

6/recent/ticker-posts

शिक्षणा बाबत ग्रामपंचायत टाकळी बु. चा अतिशय स्तुत्य व महत्वपूर्ण निर्णय



▪️महाराष्ट्र ग्रामीण न्युज प्रतिनिधी जामनेर गणेश जाधव.                                              *

 👉🏻 इ. 1 ली त प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची घरपट्टी , पाणीपट्टी व इतर कर माफ.

🔸 आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या वाढण्यासाठी सरपंच व ग्रामपंचायत टाकळी बु. यांनी काही महत्वपूर्ण व स्तुत्य निर्णय घेतले आहेत.

👉🏻 मौजे टाकळी बु।। ता. जामनेर येथील तमाम लोकांना कळविण्यात येते की, ग्रामपंचायत कार्यालय टाकळी बु॥ ने सन २०२५- २६ या वर्षासाठी गावातील शाळकरी मुलांसाठी खालीलप्रमाणे निर्णय घेतलेले असुन समस्त गावक-यांनी यांची नोंद घ्यावी.

१) जि.प.मराठी शाळा टाकळी बु॥ येथे इ. १ली मध्ये सन २०२५-२६ या वर्षासाठी प्रवेश घेणा-या विद्यार्थ्याच्या पालकांना ग्रामपंचायती तर्फे पुढील १ वर्षासाठी ग्रामपंचायतीचे घरपट्टी, पाणीपट्टी व इतर कर माफ करण्यात येणार आहेत.

२) जि.प.मराठी शाळा टाकळी बु।। येथे.इ.१ली मध्ये सन २०२५-२६ आ वर्षासाठी प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांना ग्रामपंचायती तर्फे शैक्षणिक साहित्य (गणवेश, पुस्तके, वह्या, पेन, राजा पाटी, दप्तर, बुट इ.) मोफत देण्यात येणार आहे.

 ग्रामपंचायत मार्फत सरपंच. उपसरपंच व ग्राम पंचायत अधिकारी श्री संतोष पाटील यांनी वरील प्रमाणे पत्र काढले . सदर शाळा सुरू झाल्याच्या दिवशी नवीन प्रवेश घेतलेल्या मुलांचे फुल गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्यावेळी शाळेतील मुख्याध्यापक कीर्ती राजपूत मॅडम. रजनी पाटील मॅडम .सुनीता सोनवणे मॅडम .योगेश काळे सर .संदीप सोनार सर.शिक्षक वृंद व ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच सौ वंदना भाऊराव मोरे. उपसरपंच कैलास कलाल. व इतर सदस्य व पोलीस पाटील संजय गनबास व शाळा व्यवस्थापक समिती अध्यक्ष अनिल महाले .हजर होते