पराग कु-हे कारंजा लाड प्रतिनिधि
पोलीस स्टेशन कारंजा ग्रामिण येथे ग्राम काजळेश्वर येथील सरपंच यांनी माहीती दिली कि काजळेश्वर येथील उमा नदीच्या पात्रात एका महीला नग्न अवस्थेत पडलेली आहे अशी माहीती दिल्याने आम्ही पो.नि. प्रविण खंडारे व पोस्टाफ असे त्वरीत घटनास्थळी जावुन पाहणी केली असता नदीपात्रातील महीला हिचे तोंड पुर्णपणे ठेसलेले होते, तिच्या चेह-यावर दगडाने मारल्याच्या गंभीर जखमा दिसत होत्या वरुन सदर अनोळखी महीलेची ओळख पटवुन तिचे नाव कु. माया अनेश कोडापे वय 20 वर्ष रा. काजळेश्वर असल्याचे निष्पन्न करण्यात आले, सदर मुलगी हि गतीमंद असुनभिक मागत होती असे तिची बहीनीने माहीती दिली, मृतक कु. माया कोडापे हिचा कोणीतरी अज्ञात व्यक्यीने खुन केला असल्याचे निष्पन्न झाल्याने फिर्यादी सौ. शारदा शंकर धुर्वे वय 35 वर्ष रा. काजळेश्वर यांनी दिलेल्या जबानी रीपोर्ट वरुन पो.स्टे. ला अप क्र. 222/20225 कलम 103(1), 238 (बी) भारतीय न्यायसंहिता 2023 प्रमाणे अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करण्यता आला.
सदर गुन्हयातील घटनास्थळ हे काजळेश्वर गावापासुन अंदाजे 2 कि. मी. अंतरावर असलेल्या उमा नदिच्या पुलाखालील पात्रातील असुन त्या ठिकाणी कोणतीही लोकांची वस्ती किंवा प्रत्यक्षदर्शी पुरावा नसतांना मा. पोलीस अधिक्षक अनुज तारे सा. मा. अपर पोलीस अधिक्षक लता फड मॅडम, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप पाडवी सा. यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे व त्यांचे मार्गदर्शनाखाली आम्ही पो.नि. प्रविण खंडारे तसेच सपोनि रामकृष्ण भाकडे, पोउपनि स्वप्नील चव्हाण, ग्रेड पोउपनि धनराज पवार, पोहेकॉ अमोल मुंदे, पोहेकॉ छोटेबली पप्पुवाले, पोहेकॉ रवि वानखडे, पोहेकॉ सुमित जगताप, पोहेकॉ दिपक ढोबळे, पोहेकॉ रवि नागरे, पोहेकॉ सतिष जाधव, पोकॉ तुषार भोयर, पोकॉ प्रभु जुमडे, पोकॉ अंकुश सोन्नर, चापोकॉ अनिल मुंढे, चामपोकों पल्लवी मोटे असे मिळुन घटनेपासुन आजपावेतो अथक प्रयत्न करुन आरोपी विषयी कोणतीही माहीती किंवा तांत्रीक पुरावा नसतांना पारंपारीक कौशल्याचा वापर करुन अवघ्या तिन दिवसाचे आत आरोपी अरबाज अली वल्द असलम अली वय 22 वर्ष रा. काजी प्लाट कामरगाव ता. कारंजा यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्याने कु. माया अनेश कोडापे हिचा दगडाने मारुन खुन केल्याची कबुली दिली. आरोपी अरबाज अली वल्द असलम अली वय 22 वर्ष रा. काजी प्लाट कामरगाव ता. कारंजा यास दि. 03/06/2025 रोजी अटक करण्यात आली असुन पुढील तपास मा. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप पाडवी साहेब करीत आहे





Social Plugin