Ticker

6/recent/ticker-posts

नारायण महाराज ज्ञान मंदिर येथे विद्यार्थी प्रवेशोत्सव साजरा



पराग कु-हे कारंजा लाड प्रतिनिधि 

कारंजा(लाड )येथील प. पु. नारायण महाराज ज्ञानमंदिर व कनिष्ठ महाविद्यालय येथे नवीन शैक्षणिक वर्ष  सुरुवात झाली. त्यानिमित्त शाळेमध्ये विद्यार्थी प्रवेशोत्सव कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प आणि चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले आणि त्यांच्यासाठी संवादात्मक खेळांचीही व्यवस्था करण्यात आली. शाळेमध्ये पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी चांगली उपस्थिती दाखविली. तसेचशाळेच्या मुख्याध्यापिका गायत्री नेमाने व शाळेचे सचिव संजय नेमाने यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या आगामी वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.

तसेच महाविद्यालयातील शिक्षक निखिल घुगे, विकी शिरसाट व शिक्षिका शिल्पा कथे, कविता देशमुख, सरला कडोळे, मुस्कान नंदावाले, उत्कर्षा हांडे, समीक्षा घोगरे, साक्षी हनवंते, शिक्षिका उजवणे, काळे, नागपुरे, कडू, वावगे व कर्मचारी आरती राजेधर, स्वाती धामणे यांनी सुद्धा विद्यार्थांचे स्वागत करून त्यांचे भावी वर्ष प्रगतीशील जावो यासाठी शुभेच्छा दिल्या