Ticker

6/recent/ticker-posts

मुख्याधिकारी वाघमोडे यांनी स्वीकारला पदभार



पराग कु-हे कारंजा लाड प्रतिनिधि 

कारंजा (लाड ) अखेर तीनमहिन्याच्या प्रतीक्षेनंतर महेश वाघमोडे यांच्या रूपाने येथील नगर परिषदेला नियमित मुख्याधिकारी मिळाले आहे. २४ जून रोजी नगरविकास विभागाने एका शासन निर्णयाद्वारे त्यांची निवड केली असून, त्यांनी २५ जून रोजी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.

येथील नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी दीपक मोरे यांची २० मार्च रोजी येथून अन्य ठिकाणी बदली झाली होती. त्यामुळे या पदाचा कार्यभार मालेगाव नगर पंचायतचेमुख्याधिकारी पंकज सोनूने यांच्याकडे सोपवण्यात आला होता. अखेर तीन महिन्यानंतर येथील नगर परिषदेला महेश वाघमोडे यांच्या रूपाने कारंजाला नियमित मुख्याधिकारी मिळाले आहे. त्यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिका गट अ सहाय्यक आयुक्त पदावरून येथील मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी २५ जून रोजी पदभार स्वीकारला. यावेळी त्यांचे नगर परिषदेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले