शिरुर ग्रामीण प्रतिनीधी - (शैलेश जाधव)
एखाद्याचे 'हनुमान होणे' म्हणजे त्या व्यक्तीमध्ये हनुमानजींसारखेअपार शक्ती, निस्सीम भक्ती, निस्वार्थ सेवा, निर्भयता, आणि धैर्य असणे.रवी हाही असाच प्रकाशभाऊ धारिवाल यांचा 'हनुमान'!!भक्ती, शक्ती आणि निस्वार्थ सेवेचे मूर्तिमंत उदाहरण असलेल्या शिरूर नगरीच्या सर्वात तरुण नगराध्यक्षाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!प्रकाशभाऊ धारिवाल यांच्या कार्यावर रवीची असलेली निस्सीम श्रद्धा,त्यांच्यावर असलेला पूर्ण विश्वास, आणि धारिवाल परिवाराप्रती अपार प्रेम –हीच रवीची खरी ओळख आणिहाच त्याच्यावर शिरूरच्या जनतेनं मारलेला विश्वासाचा शिक्का!
प्रकाशभाऊ धारिवाल यांच्या ह्या 'हनुमानाने' नेहमीच शिरूरकरांची निस्वार्थ सेवा केली.धारिवाल कुटुंबाने शिरूरसाठी हाती घेतलेल्या प्रत्येक कामातरवीने स्वतःला पूर्णपणे समर्पित केलं.शिरूरच्या राजकारणात "नगराध्यक्ष" हे सर्वोच्च पदआपल्याला धारिवाल परिवारामुळेच मिळाले,हे तो आजही छातीठोकपणे सांगतो.स्व. रसिकशेठ व *प्रकाशभाऊ धारिवाल* यांनी ज्या खुर्चीवर बसून शिरूरची सेवा केली,त्या खुर्चीलाही तो श्रद्धास्थान मानतो –आणि त्या खुर्चीवर न बसता शेजारच्या खुर्चीवरूनच सेवा करतो.आजच्या युगात रवीसारखा निस्वार्थ "हनुमान" मिळणे म्हणजे केवळ अशक्यच!





Social Plugin