दौंड तालुका प्रतिनिधी @कानिफनाथ मांडगे
केडगाव,ता.दौड येथील बेबी कॅनल वरील फुलाला संरक्षण कठाडे बसवण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. रात्री उशिरापर्यंत येथे वाहतूक भरपूर प्रमाणात चालू असते चालकाला अंदाज न आल्याने दुर्घटना होऊ शकते.
नुकतेच बेबी कॅनलचे अस्तरीकरण वेगाने झाले आहे परंतु केडगाव स्टेशन बाह्य वळण रस्त्यावरून कृषी उत्पन्न बाजार समितीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बेबी कॅनेलवर फुलाचे संरक्षक कठाडे तुटलेले बसवले नसल्याने धोका निर्माण होऊ शकतो.
या रोड वरून शाळेतील विद्यार्थ्यांची ये -जा असते . पुढील महिन्यात शाळा कॉलेजेस सुरू होत आहे तरी कठाडे नसल्याने दुर्घटना होण्याआधी उपाययोजना करणे गरजेचे आहे तरी सामाजिक बांधकाम विभाग , पाटबंधारे विभाग यांनी वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.





Social Plugin