Ticker

6/recent/ticker-posts

आंतरमशागतीच्या कामांना वेग



झरी जामणी: प्रतिनिधी अमोल संगमवार 

सध्या खरीप हंगामला सुरवात झाली असून त्याची पूर्वतयारी अजूनही सुरू आहे. खरीप हंगाम पूर्व शेतीच्या आंतरमशागतीच्या कामांना वेग आला असून आंतरमशागतीच्या विविध कामात शेतकरी व्यस्त झाल्याचे चित्र शेती शिवारात पाहायला मिळत आहे. तालुक्यात बागायती क्षेत्र मर्यादित असल्यामुळे खरीप हंगाम महत्वाचा आहे.

४२ हजार हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्रापैकी दरवर्षी ३५ हजारांपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी होते. पेरणीत कापूस, सोयाबीन, तुर, उडीद, मूग हे मुख्य पिके आहेत. त्यातुनच सर्वाधिक क्षेत्र कापसाचे आहे. अधिक बाजारभाव अन् अन्य पर्यायी पिकांचा अभाव असल्याने कापसाशिवाय पर्याय नाही. बदलत्या शेती तंत्राने शेतीमध्ये पशुधनाऐवजी

यंत्राचा वापर वाढला तरीही बहुतांश बहुतारा शेतकरी अद्यापही बैलाच्या साह्याने मशागतीची कामे उरकत आहेत. याशिवाय तुराट्या, काडीकस्पट, दसकट, दगड वेचणे, बंधारे दुरुस्ती व जाळणे, शेणखत शिंपडणे, नाल्या काढणे या कामासह शेती पेरणी योग्य करण्यासाठी आवश्यक त्या सर्वच बाबी शेतकरी सध्या रणरणत्या उन्हात पूर्ण करीत असल्याचे तालुक्यात चित्र आहे.

खरीप हंगामाची पूर्व तयारी करताना शेतकरी राजा पिकाला वाढ होण्यासाठी योग्य वातावरण पेरणीपूर्व मशागत करणे आवश्यक आहे. कारण यामुळे जमिनीची योग्य तयारी होते. ज्यामुळे पिकाला चांगली वाढ आणि उत्पादन मिळण्यास मदत होते. जमीन भुसभुशीत झाल्यानेजमिनीत हवा खेळती राहते, आणि मातीचा पोत सुधारतो. किड नियंत्रणासही मदत होते. तसेच पिकाला लागणारे पाणी, खत व सूर्य प्रकाश मिळण्यास मदत होते. परिणामी पिकांच्या मूळ जमिनीत खोलवर व व्यवस्थीत रूजल्याने पिकाला चांगल्या प्रकारे वाढ होण्यासाठी योग्य वातावरण तयार होते.