●आदमपूर:
बिलोली तालुक्यातील ग्राम आदमपूर येथील जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळा व महाळप्पा पटने विद्यालयात शैक्षणिक वर्ष (२०२५-२६) च्या उपक्रमांतर्गत सञातील शाळेच्या पहिल्या दिवशी सोमवार दि.१६ जून रोजी उपस्थित विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प व नवागत विद्यार्थ्यांचा सामुहिक शाळा प्रवेशोत्सव शैक्षणिक साहित्य देऊन स्वागतपर साजरा करण्यात आला.
दीड महिना उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर सोमवार पासून परिसरातील शाळा सुरू झाले आहेत.विद्यार्थी,शिक्षक व पालक यांचा समन्वय साधून शालेय गुणवत्ता वाढीसाठी हे उपक्रम निश्चितच गरजेचे ठरतात.पहिल्या दिवशी नवागत मुलांचा शाळा प्रवेशोत्सव त्या त्या शाळेत पाल्य,पालक व शिक्षक यांच्यासह विविध उपक्रम घेऊन साजरा करण्यात आला.मुलांना गुलाबपुष्प, पुस्तके,चाॅकलेट,पेन्सिल आदि साहित्य देत,बुद्धीवर्धक खेळ, विद्यार्थ्यांचे ठसे घेणे, प्राथमिक आरोग्य तपासणी,स्मरणघडी पञिका भरविणे आणि सामुहिक छायाचित्र काढणे आदि उपक्रम लक्षवेधक ठरले
तद्नंतर दोन्ही शाळेत आदमपूर परिसरातील सुजाण पालक कवी,गीतकार,पञकार जाफर आदमपूरकर यांचे शालेय मनोगत व बालकवितावाचन कार्यक्रमही घेण्यात आला.मु.अ.दशरथ कलेटवाड मुख्याध्यापक चंद्रशेखर लगडे यांचेही मार्गदर्शनपर मनोगत झाले.सहशिक्षिका सुमती जाधव, बाबासाहेब गुरले,मारोती गायकवाड, पिलगोंडे,मठदेवरू,चालीकवार, स्वामी,रामराव तुकडे,प्रल्हाद हांद्रे,मुंके, शेख,दिगांबर कोकणे, शिवराम इंगळे,माणिकराव पाटील,शिवाजी खानापुरे, रवी भुरे,माधव राहिरे आदि शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारीवर्ग व विद्यार्थी पालकांची उल्लेखनीय उपस्थिती होती.
●आदमपूर प्रतिनिधी,
●महमदरफी मदार आदमपूरकर.
Social Plugin