Ticker

6/recent/ticker-posts

स्व.रखमाबाई यांचा 17वा स्मृती दिन धनकवडी येथे साजरा



दौंड तालुका प्रतिनिधी -कानिफनाथ मांडगे 

दौंड -     स्वर्गीय रखमाबाई यांचा स्मृतिदिन... प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाचे धनकवडी सेंटर येथे ....मा स्वर्गीय रखमाबाईंचा सतरावा स्मृतिदिन धनकवडी येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्व विद्यालयाचे सेंटर धनकवडी येथे योगसाधकासमवेत साजरा करण्यात आला.

              याप्रसंगी सेंटरच्या प्रमुख सुलभा दीदी यांचा परमात्म्यावर विशेष व्याख्यान झाले... प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अनिल ताडगे यांनी त्यांच्या आई विषयी काही आठवणी सांगितल्या, आईने सांगितलेल्या समाजसेवेच्या मार्गाने  आम्ही जाण्याचा प्रयत्न करीत आहोत तसेच प्रतिष्ठान ने आतापर्यंत राबवलेल्या सामाजिक कार्याची तसेच प्रतिष्ठान मार्फत राबवलेल्या विविध उपक्रमा विषयी माहिती दिली. 

        तसेच प्रजापिता ब्रह्म कुमारी विश्वविद्यालयाचे नुकतेच राजस्थान येथील माउंट आबू येथे झालेल्या राज योग शिबिराची माहिती दिली... अनिल ताडगे व धनकवडीतील जेष्ठ नागरिकांनी या शिबिरात प्रत्यक्ष भाग घेतला होता, प्रत्येकाने  त्यांना आलेले अनुभव व मिळालेले ज्ञान, माहिती, येथील सुई सुविधा यांचे विवेचन केले, त्यानंतर उपस्थित सर्व साधकांना त्यांच्या नियमाप्रमाणे भोग देऊन कार्यक्रमाची सांगता झाली... अशी माहिती रखमाबाई प्रतिष्ठान चे अध्यक्ष अनिल ताडगे यांनी दिली.