नाशिक, प्रतिनिधी,अमन शेख,
आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून सुमारे ७८ वर्षे पूर्ण झाली .आणि याच निमित्ताने दरवर्षी प्रमाणे आपल्या देशात ठिकठिकाणी १५ ऑगस्ट निमित्ताने वेगवेगळी कार्यक्रम होताना दिसून येतात .
दर वर्षी प्रमाणे या वर्षी देखील नाशिक येथे असलेल्या नूरीया फैजाने सादिक ट्रस्ट च्या अंजुमन म्हणजेच मदरसा या ठिकाणी देशभक्ती आणि देशा बद्दलचे आगळेवेगळे प्रेम दिसून आले . या वेळी या ठिकाणी पहाटे सुमारे ७.०० वाजेच्या सुमारास झेंडावंदन करण्यात आले आणि त्या नंतर तेथे शिक्षण घेत असलेल्या मुलांकडून काही कार्यक्रम राबवण्यात आले , जसे कुराण की कीरत, नाते नबी , देशभक्ती पर गीत , लहान मुलांचे नृत्य तसेच , लहान मुलांचे भाषणं , तेही वेगवेगळ्या भाषेत ( इंग्रजी, मराठी ) असे घेण्यात आले .
या मध्ये मुलांना भेटणारे शिक्षण हे नवीन भविष्य घडविणारे आहे असे दिसून येते त्यांना शिकणारे शिक्षक आणि शिक्षिका हे देखील तितकेच अग्रेसर आहेत आणि मुलांना शिकवणे ही त्यांची आवड आहे .
या कार्यक्रमाच्या वेळी या ठिकाणी ट्रस्टी मध्ये , शादाब कोकनी , नाजीम शेख, मुस्तफा खतीब , सहाउपस्थित होते , तसेच सहसंचालक म्हणून अरफात बुबेरे, तेथे कार्यरत असणारे बाजी , जुलेखा खतीब त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून , डॉ. विजय मोतीराम देवकर , नितीन बागुल , रफिक साबीर , फैयाज हुदवी , डॉ. अमन शेख , मौलाना हाफीज हुसैन आदि उपस्थितीत होते.
Social Plugin