Ticker

6/recent/ticker-posts

मालेगाव येथील 45 वर्षांपासून बारी ची प्रथा कायम ; शर्मा कुटुंबियांचे योगदान



मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले


मालेगाव :- मालेगाव शहरात श्रीराम बन्सीलाल शर्मा यांनी सुरू केलेली नागपंचमी च्या बाऱ्याची प्रथा आजही कायम आहे अनेक लोक या पूजेचा लाभ घेतात.

            शहरात श्रीराम बन्सीलाल शर्मा यांनी नागपंचमी च्या निमित्ताने नागदेवतेचे पूजन करून बाऱ्या म्हणण्याची प्रथा सुरू केली होती ती प्रथा आजही सुरू असून त्याबद्दल आज 45 वर्षे पूर्ण होत आहेत यापूर्वी अमृता आंध आणि वामन गारोडी यांनीं यांची सुरवात स्वतंत्र काळापासून केली होती असे म्हटले जाते नन्तर शर्मा आणि त्यांचे मित्रमंडळ यांनी ही प्रथा सुरू केली होती अनेक भजन गीत ते गात होते ती प्रथा आजही त्यांचे मुलं सुनील आणि नरेश शर्मा अतुल शर्मा व त्यांचे मित्र मंडळ यांनी कायम ठेवलेली आहे आज रोजी त्यांचे मुलं ही बाऱ्याचे प्रथा कायम ठेवून भव्य महाप्रसादाचे सुद्धा आयोजन करत असतात दिनांक 28 जुलै रोजी भव्य दिव्य बाऱ्या व महाप्रसादाचा कार्यक्रम सुद्धा बालाजी मंदिर येथे करण्यात येणार असुन दर वर्षी अंदाजे तीन हजार पेक्षा जास्त भाविक भक्त महाप्रसादाचा लाभ घेत असल्याचे बोलल्या जात आहे..