मतदानाद्वारे बालग्रामधील विविध सहा समित्यांची झाली निवड.
देगलूर प्रतिनिधी- जावेद अहेमद
जालना येथील बालग्राम अनाथालयाच्या सहा व्यवस्थापकीय समित्यांसाठी नुकतीच निवडणूक घेण्यात आली. यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त मतदान करत विविध समित्यांची निवड केली. विद्यार्थीदशेत लोकशाही प्रक्रियेची ओळख करून देणाऱ्या हा स्तुत्य उपक्रम बालग्राममध्ये खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला.
पालख्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या सहारा अनाथालय तथा बालग्राम परिवारातील विद्यार्थ्यांची एकूण व्यवस्था स्वतः विद्यार्थीच पाहतात. २०२५ सालची निवडणूक नुकतीच पार पडली. सहा समित्यांसाठी एकूण २२ उमेदवारांनी निवडणूक लढवली. सर्व उमेदवारांना चिन्ह वाटप करत बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यात आली. बालग्रामचे संतोष व प्रीती गर्जे यांच्यासह अधीक्षक, काळजी वाहक,स्वयंसेवक व स्वयंपाकी मावशी यांनी देखील मतदानात सहभाग घेतला होता.
सर्वाधिक मते घेऊन कृष्णा माने क्रीडा समितीच्या अध्यक्षपदी निवडून आला. मयूर सुरवसे शिक्षण समिती अध्यक्ष, दिपाली हिरोळे आहार व पाहुणचार समिती अध्यक्ष, काजल वनवे सांस्कृतिक समिती अध्यक्ष, 'तर आकाश मोरे स्वच्छता व आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी निवडून आले. आदित्य जाधव, दिव्या जाधव, वैष्णवी गर्जे, शिवकन्या जाधव, रवी खाडे, कल्पेश अरसूळ, अनुराधा सरोदे, राज माळी, संकेत बोडके सदस्यपदी निवडून आले. काजल वनवे, विठ्ठल फाटे, श्रेयस नाडे, अनुष्का डोंगरे, आकाश मोरे, हर्षद डमाळे, रुपेश हिरोळे, करण आदींना मतदारांनी बिनविरोध निवडून दिले. अधीक्षक संदीप नेहे, काळजी वाहक पवार, धम्मपाल, सुवर्णा, गोपाल यांनी निवडणूक प्रक्रियेसाठी सहकार्य केले.
लोकशाहीची मूल्ये रुजवण्याचा प्रयत्न संतोष गर्जे -
मतदान हा लोकशाहीचा सर्वाधिक महत्त्वाचा भाग असतो. पण आजही आपल्या देशातील मताचा टक्का हा ६० ते ७० च्या पुढे सरकत नाही. ही दुर्दैवी गोष्ट असून देशाच्या भावी नागरिकांना विद्यार्थीदशेतच लोकशाहीची ओळख व्हावी. यासाठी आम्ही छोटासा प्रयत्न करत असल्याचे बालग्रामचे संतोष गर्जे यांनी सांगितले.
Social Plugin