Ticker

6/recent/ticker-posts

सगरोळी हिंगणी पानंद रस्त्याचा प्रश्न सुटला सतीष गौड मोतीवार यांच्या प्रयत्नाना यश. - महसूल मंत्री बावनकुळे यांची घेतली भेट



बिलोली प्रतिनिधी - आमेटवार राजेश 

बिलोली तालुक्यातील सगरोळी महसुल मंडळा अंतर्गत येणाऱ्या सगरोळी ते हिंगणी पांदण रस्त्याचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित होता भारतीय जनता युवा मोर्चाचे नांदेड दक्षिण जिल्हा अध्यक्ष सतीष गौड मोतीवार यांच्या अथक प्रयत्नानंतर विषय निकाली लागला आहे जिल्ह्यात कृषी विज्ञान केंद्र व शैक्षणिक संकुल प्रसिद्ध असलेल्या सगरोळी येथील शेतकरी बांधवांना शेती कामांसाठी हिंगणी पांदण रस्त्याने जाताना फार त्रासदायक रस्ता असुन सदरील पांदण रस्त्यांवर चालणे म्हणजे तारेवरची कसरत करावी लागत असत झाडे झुडपे, अरूंद रस्ता यामुळे शेतकऱ्यांना अनंत अडचणीना तोंड द्यावे लागत होते भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे नांदेड जिल्हा अध्यक्ष सतीष गौड मोतीवार यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रत्यक्ष भेटून तात्काळ हिंगणी पांदण रस्त्याचा प्रलंबित प्रश्न निकाली काढला आहे सदरील प्रकरणी महसूल मंत्र्यानी बिलोलीच्या तहसीलदारांना हिंगणी पांदण रस्ता बनवण्याचे आदेश दिले आहेत मागिल अनेक वर्षांपासून प्रलंबित हिंगणी पांदण रस्त्याचा प्रश्न तात्काळ सोडवण्यात यशस्वी ठरलेले भाजपा पदाधिकारी सतीष गौड मोतीवार यांच्या कार्याचे शेतकरी बांधवाच्या वतीने कौतुक होत आहे.

सगरोळी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी नियुक्ती झाल्यानंतर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन पांदन रस्त्याचा प्रश्न निकाली लावल्याने सगरोळी सर्कल मधील अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.