तालुका प्रतिनिधी मारोती गाडगे/ गेवराई
गेवराई (बीड):-ता १२/जुलै शनिवार रोजी गेवराई तालुक्यातील जि, प, प्रा, शाळा कटचिंचोली शाळेमध्ये शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री मारोती गाडगे यांच्या अध्यक्षतेखाली पालक मेळवा व चालू वर्षाची शालेय शिक्षण समितीची बैठक पार पडली.या वेळी शाळेच्या समस्या शिक्षकांच्या समस्या या विषयावर चर्चा झाली.
मुलांना पुढील शिक्षण आपन चांगल्या पद्धतीने कसे देऊ आणि काही खाजी शाळेचे शिक्षक काही वर्गातील मुलांना पळण्याचा प्रयत्न करत आहेत, म्हणजे जि प प्रा शाळा मोडण्याचा प्रयत्न करत आहेत.तुम्ही गाडी भाडे देऊ नका, आम्ही कपडे, पुस्तक,मोफत देऊ, तुम्ही टिसी पन आणु नका फक्त मुलांना पाठवा आसे म्हणतात आणि मुलांना घेऊन जातात.म्हणजे कटचिंचोली शाळेचा वर्ग बंद पाडायचा प्रयत्न केला जातो.
या विषयावर पन पालकांना सांगुन आपले मुले आपल्या शाळेत राहु द्या आशा सुचना पालकांना दिल्या.या कार्यक्रमाला उपस्थित शाळेचे शिक्षण समितीचे उपाध्यक्ष मधुकर औटी,मुख्याध्यापक श्री पवार सर, जोशी सर, अमोल सर, विशाल सर,गावचे सरपंच रविंद्र निवारे, उपसरपंच,सोपान कोकणे, ग्रामपंचायत सदस्य सुनिल अंगरखे, शिक्षण समितीचे सदस्य,अजय कोकणे,पालक, अब्दुल शेख, गोपीचंद सोनवणे, दादासाहेब मुळे, बाबा पठाण,द्वारकादास कोकणे,शिंदे आसे अनेक पालक उपस्थित होते.अखेर अमोल सर यांनी आभार मानले व कार्यक्रम संपला आसे जाहीर केले.
Social Plugin