प्रतिनिधी:-ता.पुर्णा एरंडेश्वर येथील लो.क.शा आण्णा भाऊ साठे यांचे सभागृह .समाज मंदिर हे सन 1988 मधील असुन सध्यां च्या स्थिंतीला त्याची खूप वाईट अवस्था झाली आहे त्याचे पंत्रे सडुन आत मध्ये पाणी जात असुन भिंती चे त्या पाण्यामुळे प्लास्टर गळून पडत आहे पत्रे एंगल जंगखाऊन खूप खराब झाली.आहेत त्यामुळे तेथिल सर्व मातंग समाज बांधवांना विविध कार्यक्रमांना अनेक अडचनीना सामोरे जावं लागत आहे तरी आपण ग्रामपंचायत मधील ग्रामविकास अधिकारी तथा सरपंच उपसरपंच सर्व सदस्यांनी नोंद घेऊन आम्हाला दुरुस्ती करावी किंवा निधी उपलब्ध करुन द्यावा ही विनंती आज दिनांक 11-7-2025 च्या पंचायत बैठकीत निवेदन देण्यात आले. दि 19/8/2025 रोजी एरंडेश्वर येथील आण्णा भाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते त्यामुळे लवकरात लवकर तेथिल समाज मंदिर दुरुस्ती करावी असे अभिजित लश्मण रनबावळे ता.अध्यक्ष पुर्णा आनंद भगवान जोगदंड.विशाल सुरेश रनबावळे अंकुश बबनराव ऊफाडे संजय बंडू जोगदंड रामा बबन सोनटक्के सुरज श्याम काळे इत्यादींनी उपस्थित राहून निवेदन दिले
Social Plugin