प्रतिनिधी जिवन साळवे
प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत भारतीय कृषी पीक विमा कंपनीच्या वतीने सिंदखेड राजा तालुक्यात पीक विमा कार्यशाळा आणि प्रचार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून संरक्षण मिळवण्यासाठी योजनेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी शेतकरी बांधवांना पीक विमा योजनेची सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांना नोंदणीसाठी जवळील 'आपले सरकार सेवा केंद्र', बँका, तसेच केंद्र सरकारच्या अधिकृत पोर्टलवर स्वतः ऑनलाइन अर्ज करता येईल, असे आयोजकांनी स्पष्ट केले. यावेळी भारतीय कृषी पीक विमा कंपनीचे तालुका समन्वयक योगेश मांटे रवींद्र गोरे उमेश घुगे गोपाल देशमुख आदी उपस्थित होते.
Social Plugin