प्रतिनिधी--स़ंजय भरदुक मंगरुळपीर
मंगरूळपीर--तालुक्यातील हिसई येथील श्री विनोद सहदेवराव जाधव यांनी सहा एकर जमीनीमध्ये एकूण ४५ क्विंटल (पंचेचाळीस क्विंटल) उत्पादन घेतले आहे.विशेष म्हणजे संत्रा आंतरपीक मध्ये सुद्धा योग्य नियोजन करून चांगले उत्पादन मिळाले.कमी खर्चात त्यांनी चांगल्या भावात विकल्या मुळे त्यांना चांगलाच फायदा झाला आहे पहिले भाव कमी होते पण आता आज सध्या वाशिम येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये २३५००/₹प्रति क्विंटल या दराने त्यांना भाव मिळाला या प्रमाणे ४५ क्विंटल चे १०,५७,५०० रुपये एकूण दहा लाख सत्तावन हजार पाचशे रुपये मिळाले आहेत. अंदाजे खर्च चाळीस हजार रुपये आला आहे निव्वळ नफा त्यांना १०,१७,५००/ रुपये मिळाले आहेत. सहा एकरात दहा लाखाचे उत्पन्न घेतले आहे त्यामुळे चिया पिकांचे विक्रमी उत्पादन घेतल्यामुळे परिसरात मध्ये चर्चा चा विषय ठरला आहे तसेच विनोद भाऊ शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.
Social Plugin