Ticker

6/recent/ticker-posts

फॉर्म लेडी सौ.भाग्यश्री गायकवाड यांचा आय. सी .ए. आर .स्थापना दिनी सन्मान



संजय भरदुक  प्रतिनिधी 

भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या 97 व्या स्थापना दिनानिमित्त कृषी विज्ञान केंद्र करडा तालुका रिसोड जिल्हा वाशिम या ठिकाणी वाशिम जिल्ह्यातील कर्तुत्वान प्रगतशील महिला युवक उद्योजक यांचा यशोचीत सत्कार मान्यवरांच्या हस्ते होणार आहे सत्काराकरिता कृषी विज्ञान केंद्र वाशिम च्या वतीने ग्राम गायवळ तालुका कारंजा जिल्हा वाशिम येथील वाशिम जिल्ह्यातील फॉर्म लेडी सौ भाग्यश्री गायकवाड यांच्या कार्याची दखल घेत सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते भव्य दिव्य असा सत्कार होणार आहे सौ.भाग्यश्री गायकवाड यांनी ग्राम गायवळ या ग्रामीण भागामध्ये युवकांच्या हाताला काम व ग्रामीण महिलांना रोज रोजगार निर्मिती करिता डॉ.पंजाबराव देशमुख बायो इनपुट प्रशिक्षण केंद्र व गांडूळ खत निर्मिती प्रकल्प गायवळ तालुका कारंजा प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना निविष्ठा निर्मितीचे प्रशिक्षण देऊन ग्रामदैवत गायवळ येथे मोठ्या प्रमाणावर गांडूळ खत निर्मिती, दशपर्णी अर्क निर्मिती ,निमास्त्र निर्मिती ,ट्रायकोडड्रामा निर्मिती, मायक्रोरायजा निर्मिती गांडूळ कल्चर निर्मिती ,वर्मी वॉश निर्मिती गांडूळ खत तयार करण्याच्या बेडची निर्मिती, शेत परसबाग ,शेवगा बियाणे शाश्वत निर्मिती,करून गावातील महिलांच्या हाताला काम दिले गावातील पंधरा महिलांना बारा महिने रोजगार उपलब्ध करून दिला तसेच परिसरातील नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर करून नैसर्गिक निविष्ठा निर्मिती केंद्राच्या माध्यमातून परिसरातील शेतकऱ्यांना नैसर्गिक निविष्ठा अल्पशा दरामध्ये उपलब्ध करून दिल्या नैसर्गिक निविष्ठा शेजारीण जिल्हा सह बाहेरील राज्यांमध्ये सुद्धा पुरवठा होत आहे ग्राम गायवळ येते शाश्वत नैसर्गिक शेतीचे मॉडेल तयार करून जिल्ह्यातील फॉर्म लेडीज म्हणून ओळख असणाऱ्या सौ भाग्यश्री गायकवाड यांनी संपूर्ण देशामध्ये आदर्श निर्माण केलेली आहे अशा फॉर्म लेडी चा कृषी विज्ञान केंद्र करडा यांच्या माध्यमातून भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली च्या 97 व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य दिव्य असा सत्कार होणार आहे करिता सर्व स्तरावरून त्यांचे अभिनंदन केले जात आहे