दौंड प्रतिनिधी कानिफनाथ मांडगे
केडगाव( दौंड) येथे काल ता. 14 रोजी हुतात्मा एक्सप्रेस खाली घेऊन आत्महत्या केल्याची घटना सकाळी साडेनऊ वाजता घडली आहे
याबाबत दौंड रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्या व्यक्तीचे नाव अमोल अशोक निंबाळकर असून वय वर्ष 39 आहे तो आंबळे तालुका शिरूर येथील रहिवासी असल्याची अधिक माहिती मिळत आहे .अमोल यांनी रेल्वे समोर येऊन आत्महत्या का केली याबाबत मात्र अधिक माहिती मिळू शकली नाही
सोमवारी सकाळी साडेनऊच्या दरम्यान घडलेल्या या घटनेमुळे केडगाव रेल्वे स्टेशन जवळ एकच खळबळ माजली सदर व्यक्ती थेट रेल्वे समोर आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला त्याने आत्महत्या का केली याबाबत दौंड रेल्वे पोलीस हवालदार टिंगरे साहेब हे अधिक तपास करीत आहेत
Social Plugin