अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ
अंबड तालुक्यातील 111 ग्रामपंचायतीचे सन २०२५-२०३० या कालावधी करीता सरपंच या पदाकरीता आरक्षण दि.१४.०७.२०२५ रोजी सोडत बैठक तहसील कार्यालयात पार पडली यावेळी विजय चव्हाण प्राधिकृत अधिकारी तथा तहसिलदार अंबड.उमाकांत पारधी सनियत्रण अधिकारी उपविभागीय अधिकारी अंबड आदी उपस्थिती होती.
अंबड तालुक्यातील एकूण 111 ग्रामपंचायती साठी २०२५-२०३० या कालावधीकरीता सरपंच पदाचे आरक्षण दिनांक 14 जुलै 2025 रोजी जाहीर करण्यात आले.
*प्रमुख आरक्षण गट व श्रेणी*
१.अनुसूचित जाती (SC)
अनुसूचित जाती– महिला
उदा:भिंवडीबोडखा,वलखेडा,पारनेर इ.
अनुसूचित जाती–सर्वसाधारण
उदा:सारंगपूर,नारायणगाव (कासारवाडी), ढालसखेडा इ.
२.अनुसूचित जमाती (ST)
अनुसूचित जमाती – महिला
उदा: मार्डी, वडीग्रोदी
अनुसूचित जमाती–सर्वसाधारण
उदा: डोमलगाव
३.नागरिकांचा मागासवर्ग (OBC)
महिला
उदा:डोमेगाव,आपेगाव,झोडेगाव/कानडगाव, शिराढोण/वाडीशिराढोण इ.
सर्वसाधारण
उदा: टाका,किनगाव,दुनगाव,पराडा इ.
४.सर्वसाधारण –महिला
उदा: ह.पोखरी,लालवाडी,गोदी, महाकाळा/भगवाननगर,डावरगाव,सुखापुरी इ.
५.सर्वसाधारण (Open)
उदा:चंदनापुरी बु.,दुधपुरी,नांदी, बनटाकळी, पांगरखेडा,शहापुर,बारसवाडा इ.
Social Plugin