Ticker

6/recent/ticker-posts

विद्युत प्रवाह असलेला तार बैलाच्या अंगावर पडल्याने बैल जागीच ठार




 राजपाल बनसोड प्रतिनिधी दिग्रस 


 दिग्रस : रविवार सकाळी 11 वाजताच्या दरम्यान ओमप्रकाश अट्टल यांच्या शेतात बांधून असलेले बैलांच्या अंगावर अचानक विद्युत प्रवाह असलेला तुटून बैलाच्या अंगावर पडल्याने बैल जागेवरच मरण पावला शेतात असलेल्या गड्याने ओम प्रकाश अटल यांना फोन लावून बैल मरण पावल्याची माहिती दिली.     

ओमप्रकाश अट्टल यांच्या शेतात चरत असताना बैलाच्या अंगावर विद्युत प्रवाह असलेला तार तुटून पडल्याने बैल जागेवर ठार झाला शेतीच्या कामाच्या दिवसातच काळाने घाला घातल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले शेतकरी ओम प्रकाश यांनी दिग्रस पोलीस स्टेशन येथे तक्रार दिल्यानंतर बीड जमादार कैलास देवकर व पटवारी अशोक साबळे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला पशुवैद्यकीय विकास अधिकारी अरुण जाधव सहाय्यक जुनेद व सलीम शेख व सहदेव यांनी पोस्ट पोस्टमार्टम केले. 

विद्युत महामंडळाचे कलगाव येथील विद्युत अभियंता अंकित पाटील सहाय्यकअकिब दुंगे, सुनकेवार यांनी पंचनामा केला शॉर्टसर्किट झाल्यामुळे तार तुटून पडले आहे पडले असेल असे विद्युत अभियंता अंकित पाटील यांनी सांगितले.बैलाची अंदाजे किंमत 80 हजार रुपये इतकी असल्याने शेती हंगामाच्या दिवसात एक बैल मरण पावल्याने शेतकरी संकटात सापडले आहे. अनेक समस्यांना समोर जाऊन शेतकरी आपली शेती कशी बशी करत आहे.त्यात नवीन संकट आल्याने लवकरात लवकर योग्य ते मदत अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.