Ticker

6/recent/ticker-posts

31 जुलै ही पिक विमा भरण्याची अंतिम तारखा शेतकऱ्यांनी वेळेत पिक विमा भरावा.


 बिलोली प्रतिनिधी गणेश कदम.

आटकळी (ता. बिलोली) – प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2025 अंतर्गत शेतकऱ्यांसाठी पिक विमा भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै आहे. त्यामुळे गावातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकांसाठी पिक विमा भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

आटकळी ग्रामपंचायत हद्दीतील शेतकरी सी.एस.सी. केंद्रावर जाऊन पिक विमा भरू शकतात. विमा भरताना सातबारा उतारा, आधार कार्ड आणि बँक पासबुक आवश्यक आहे.पावसाळ्यात पिकांचे नुकसान झाल्यास विमा संरक्षणाचा लाभ घेण्यासाठी वेळेत विमा भरलेला असणे गरजेचे आहे. त्यामुळे शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर विमा प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.