Ticker

6/recent/ticker-posts

कासराळी येथील लाल बहादूर शास्ञी विद्यालयात कथामाला संपन्न




●आदमपूर प्रतिनिधी/महमदरफी मदार आदमपूरकर 

●आदमपूर:बिलोली तालुक्यातील ग्राम कासराळी येथील लाल बहादूर शास्ञी विद्यालयात गुरुवार दि.२४ जुलै रोजी दुपारी पूज्य साने गुरूजी कथामालेचे आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमांतर्गत इयत्ता दहावी वर्गातील मुला-मुलींनी सदरील नियोजन घडवून आणले होते.

पूज्य साने गुरूजींच्या शैक्षणिक कार्य व विचारांची विद्यार्थ्यांना जाणीव व्हावी,या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रम अध्यक्ष दहावी वर्गातील ॠतूजा हुळगे तर प्रमुख पाहुणे म्हणून परिसरातील कवी, गीतकार,पञकार जाफर आदमपूरकर यांची उपस्थिती होती.सर्वप्रथम साने गुरूजी यांच्या प्रतिमेचे पूजन तद्नंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.प्रास्ताविक सहशिक्षक विकास कासराळीकर यांनी केले.

शाळेतील संस्कृती सोमासे,पुनम बच्चेवार,सारिका इबितदार, पूजा लंके,शुभम खंडेलोटे,श्रद्धा इबितदार, अमरीन शेख,माहिरा शेख,अंकिता बरबडे,स्वाती काटेवाड, नंदिनी शिंदे,श्रीदेवी इंगळे,अंकिता दंत्तापल्ले,जान्हवी, ईश्वरी यरपलवार,अनुजा बरबडे,संध्यारानी बोरोड, बालाप्रसाद इजुलकंठे,योगेश भुरे,गायञी दंत्तापल्ले आदि मुला मुलींनी मनोगत व कथा सादरीकरण केले.प्रमुख पाहुणे कवी,गीतकार जाफर आदमपूरकर यांनी साने गुरूजी लिखित भावगर्भ 'सोनसाखळी' ही कथा आणि मार्गदर्शन,एकापेक्षा एक बालकविता व ग्रामीण कवितांचेही सादरीकरण करीत विद्यार्थांना मंञ मुग्ध केले.

सदरील कार्यक्रमास पाटील एस.एम.,कासराळीकर व्ही.आर.,फुलारी ए.एम.,सुभानकर एस.जी.,गायकवाड ए.एन.,लखमावाड एस.आर.,कुलकर्णी एच.एस.,पाचपिंपळीकर एस.एन.,ठावरे एन.व्ही., ठक्करवाड जी.जी.,गंगलोड एम.एन.,इजुलकंठे जे.एच.,आदि विद्यार्थी,पालक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग उपस्थित होते. सूञसंचालन सुनन्या लंके तर आभार सहशिक्षक संजय पाचपिंपळीकर यांनी मानले.