Ticker

6/recent/ticker-posts

कारंजा शहरांमध्ये कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन




डॉ गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी 


कारंजा दि. 24 जुलै रोजी कारंजा शहरात नवीन बायपास येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात शेतकरी, शेतमजूर व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे चक्काजाम आंदोलन दि 24 जुलै रोजी पार पडले. प्रहार संस्थेचे संस्थापक मा.ना. बच्चू भाऊ कडू यांनी पुकारलेल्या या आंदोलनास शेतकऱ्यांनी प्रतिसाद देत मोठ्या संख्येने प्रतीसाद नोंदविला. या आंदोलनात उपस्थित शेतकऱ्यांसमोर महेश राऊत, राजीवभाऊ भेंडे, राजीव अवताडे, भारत भगत, ओमप्रकाश तापडियाजी इत्यादींनी मार्गदर्शन करत शेतकऱ्यांची कर्जमाफी व अन्य मागण्या त्वरित पूर्ण करण्यासाठी निद्रिस्त असलेल्या सरकारला जागे करण्यासाठी चक्काजम आंदोलन करीत असल्याचे सांगितले, फडणवीस सरकारने सत्तारूढ पक्षाने निवडणुका दरम्यान कर्जमाफी करण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना अनेक सभेत दिले होते, आज शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून कर्जमाफी देण्याचे हेतुपुरस्परपणे टाळले आहे, त्यामुळे शेतकरी नेते मा.ना. बच्चू भाऊ कडू यांनी संपूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन पुकारले होते,.

 सत्तारूढ पक्षाने येवढे दिवस होऊनही अद्याप कर्जमाफीची तारीख जाहीर केली नाही, नाईलाजास्तव शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागत आहे, राज्यातील शेतकरी शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करीत आहे सत्ता मिळताच शब्द फिरविणारे सरकार जनतेसमोर उघडे पडले आहे शेतकऱ्यांचा निर्धार पक्का असुन बच्चू भाऊ कडू यांच्या नेतृत्वात कर्जमाफी मिळवणार असल्याचा ठाम विश्वास आंदोलनातील उपस्थित मार्गदर्शनांनी केला, या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी रस्त्या अडवल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहने थांबली होती, उपस्थित शेतकऱ्यांनी शासनाच्या शेतकरी विरोधीत धोरणा विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली, या आंदोलनात, महेश राऊत, राजीव भेंडे, विवेक गाडगे, दिनेश वाडेकर, संकेत नाखले, ओमप्रकाश तापडीयाजी, शुभम बोणके, भारत भगत, श्रीकांत ठाकरे, राजीव अवताडे, गजानन अहमदाबादकर, अरुण चव्हाण, मदन महल्ले, विजय चव्हाण, नितेश चव्हाण, मुलचंद राठोड, भोजराज राठोड, सिद्धी गिरी, जितेश जाधव, बादल राठोड, जय काळे, महेश राठोड, हरिओम राठोड, सुदर्शन गिरी, खुशाल भाऊ, विक्की घोटकार, गजानन करडे, अतुल गायकवाड, राजू घुले, प्रदीप उपाद्धे, चेतन ढळे, नंदू गिरी, आकाश राऊत, गोपाल चौधरी, हरिओम हिंगणकर, भूषण काळे, अविनाश राठोड, इत्यादीसह शेतकरी, शेतमजूर, विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते,