बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
पुसेगाव ता . खटाव येथील सेवागिरी विदयालयाने शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग यश मिळविले . सन २०२४-२५ या वर्षामधील शासकीय शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये श्री सेवागिरी विद्यालयाचे इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये जिल्हास्तरीय यादीमध्ये शार्दुल प्रकाश पवार - २७२ गुण मिळवून २०वा क्रमांक , साईश राहुल गोरे -२६८ गुण मिळवून ३२ वा क्रमांक व इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये जिल्हास्तरीय यादीमध्ये काटकर तनिषा संतोष -२६० गुण मिळवून जिल्ह्यात ९वा क्रमांक व खटाव तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक,इनामदार असीम असलम - २५२ गुण मिळवून ३०वा क्रमांक , जाधव सिद्धी धनंजय - २३२ मिळवून १२२वा क्रमांक , देवकर सिद्धी श्यामसुंदर -२२६ मिळवून १६०वा क्रमांक, गलांडे अनुष्का राहुल - २२४ गुण मिळवून १६६वा क्रमांक ,डंबारके श्रीराम ज्ञानेश्वर -२२४ गुण मिळवून १६७वा क्रमांक मिळविला .
विभाग प्रमुख सौ जगताप वाय.एल. श्री भंडलकर डी. बी., सौ यादव एम.के. श्री पठाण ए.ए. यांनी ८ वी शिष्यवृत्ती च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ५ वी च्या शिष्यवृत्तीच्या विद्यार्थ्यांना श्री गोरे आर.व्ही., सौ कांबळे ए.ए. श्रीम.भोसले पी.बी. यांनी मार्गदर्शन केले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सावंत ए.बी. , पर्यवेक्षका सौ.डुबल एस. यु. ,स्कूल कमिटी सदस्य व सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे माजी चेअरमन श्री बाळासाहेब जाधव, संतोष जाधव व श्री मोहन तात्या जाधव तसेच पुसेगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ व पालक यांनी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचे , त्यांच्या पालकांचे व सर्व शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
Social Plugin