Ticker

6/recent/ticker-posts

श्री नागनाथ विद्या मंदिर बुध मध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप .



बुध  दि . [ प्रकाश राजेघाटगे ] 

कै .किसन काशिनाथ काळोखे राजापूर यांच्या 6 व्या स्मृतिदिनानिमित्त लायन्स  क्लब पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी यांच्या सौजन्याने श्री नागनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मंदिर बुध मधील विद्यार्थ्यांना शालेय दप्तर व वह्या यांचे वाटप   उपस्थित मान्यवरांचे हस्ते करण्यात आले . यावेळी लेखक नर्मदा प्रकाशन प्रा .अमृतराव काळोखे , सातारा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अभय राजेघाटगे, माजी सेवानिवृत्त दशरथ घनवट गुरुजी , तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण , सागर शिंदे व पर्यवेक्षक नाना दडस तसेच जेष्ठ शिक्षक तानाजी पाटील यांच्या शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले . मान्यवरांनी डॉ बापूजी साळुंखे , स्वामी विवेकानंद व कै . किसन काळोखे यांना अभिवादन केले . प्राचार्य अंकुश भांगरे यांच्या मार्गदशनाखाली नाना दडस , तानाजी पाटील व महादेव खोमणे यांनी मान्यवरांचे स्वागत केले .

दशरथ घनवट गुरुजी यांनी प्रा .आमृतराव काळोखे  करीत असलेल्या सामिजीक कार्याबद्दल सांगितले व स्मृतिदिना निमित्त आगळा वेगळा उपक्रम राबवुन विद्यार्थी व समाजाला सामाजिक संदेश दिला असे मत मांडले . अभयराजे घाटगे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की काळोखे सर दरवर्षी शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करत असतात व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देतात . स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून त्यांनी आनेक विद्यार्थी घडवले आहेत . प्रा आमृतराव काळोखे मनोगतामध्ये यांनी सांगितले की वडीलांच्या स्मृतिदिना निमित्ताने कुठलाही धार्मिक कार्यक्रम न करता समाजहिताचे व विद्यार्थी हिताचे उपक्रम राबवत असतोत . ही जन्मभूमी महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांची आहे त्यांच्या विचारांचा वसा घेऊन आम्ही काम करत असतोत . विद्यार्थी यांना शालेय साहित्य वाटप करत असताना त्यांना थोडा फार हातभार लावावा हाच कार्यक्रमाचा उद्देश आहे . 

तसेच त्यांनी लायन्स क्लब पिंपरी चिंचवड राबवित असलेले कार्यक्रम व उपक्रम याबद्दल माहिती दिली.उपस्थित मान्यवरांनी विश्वजीत नाना दडस हा 8वी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात 13 वा जिल्हयात 4था क्रमांक मिळवला . त्याबद्दल त्याचे अभिनंदन केले . तसेच काळोखे सर व घनवट गुरुजी यांनी रोख रक्कम बक्षिस दिली तसेच कु बोराटे ऐश्वर्या अशोक व फडतरे श्रेयश सखाराम राष्ट्रीय एन एम एम एस शिष्यवृत्ती धारक झाले त्याबद्दल त्यांचे कौतुक करून अभिनंदन केले . वं सारथी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी यांचाही सन्मान व अभिनंदन केले . विद्यालायाचे पर्यवेक्षक दडस सर व विद्यार्थिनी श्रावणी काळोखे दोघांनाही मान्यवरांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या . या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन भगवान सरवदे यांनी केले व आभार तानाजी पाटील यांनी मानले .