Ticker

6/recent/ticker-posts

चांडोळ्यात वारकऱ्यांच्या वतीने महाप्रसाद



आदमपूर प्रतिनिधी/महमदरफी मदार आदमपूरकर 

मुखेड तालुक्यातील ग्राम चांडोळा येथील काही 

विठ्ठल भक्त वारकरी पंढरपूर दर्शनाकरिताआषाढी एकादशीनिमित्त चांडोळा येथून पंढरपूर येथे  पायी वारी करीत निघाले होते.गावात पोहोचल्यानंतर पश्चात शनिवार दि.१२ जुलै रोजी वारकर्‍यांच्यावतीने गावात महाप्रसाद वाटप करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील वैष्णव भक्तांचे आराध्य दैवत श्री.क्षेञ पंढरपूर येथील विठ्ठल देवस्थान गणले जाते.दरवर्षी  लाखों वारकरी पायी वारीने दर्शन घेऊन गावी परततात. चांडोळा येथील वारकरीही पायी वारीने पंढरपूर येथे गेले होते.दर्शन आणि सुखरूप पायी वारी करून आल्यानंतर गावास त्यांनी महाप्रसाद वाटप करीत पुण्य मिळविले आहे.सदरील महाप्रसाद कार्यक्रमास जेष्ठ पुरूष,महिला वारकरी,प्रतिष्ठित नागरिक,बाल गोपाळांनी आस्वाद घेतला आहे.