Ticker

6/recent/ticker-posts

श्री हनुमानगिरी हायस्कूल पुसेगावमध्ये पालक शिक्षक सभा उत्साहात संपन्न



 बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे ] 

पुसेगाव  येथील श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री हनुमानगिरी हायस्कूल मध्ये पालक शिक्षक सभा  उत्साहात संपन्न झाली. सदर सभेत श्री अनिल पाकले सरांनी स्कॉलरशिप व गुरुकुल उपक्रमाची माहिती दिली. सौ. अमृता जाधव यांनी प्रास्ताविक केले.श्री यशवंत घुगरे यांनी वर्षभरातील शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. श्री मोहनराव गुरव यांनी आदर्श पालकत्व या विषयावर मार्गदर्शन केले.श्री प्रकाश ठोंबरे, सौ.हेमलता फडतरे, श्री नरहरी पंडित, श्री विजय गोरे,  श्री चंद्रकांत शिंदे इत्यादी पालकांनी मनोगत व्यक्त केली प्राचार्य दत्तात्रय गोफणे यांनी शाळेतील नव उपक्रमाची माहिती दिली. श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळवून देण्यासाठी बेसिक फाउंडेशन कोर्स सुरू केले असल्याचे नमूद केले.श्री जाधव बी. एस. यांनी आभार मानले.सहविचार सभेस मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होता.