*जिल्हातील संबंधित रस्ते व वाहतूक विभागाने रस्ता दुरुस्ती करून देण्याची मागणी:-जावेद धन्नू भवानीवाले*
मालेगाव प्रतिनिधी
मेडशी:-दि 28/07/2025 मेडशीकडून मुगळा मार्गे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली असून, मेडशी ते मुगळा या पाच ते सात किलोमीटर अंतर असलेल्या रस्त्यवर जागोजागी सगळीकडे खड्डेच खड्डे पडले असल्यामुळे मेडशी परिसरातील शेतकरी, शेतमजूर व वाहनधारक याना तारेवरची कसरत करून जिव घेणा प्रवास करावा लागत आहे. संबंधित वाशीम जिल्हातील रस्ते वाहतूक विभागाने वेळीच लक्ष घालून व्यवस्थित रित्या रस्त्याची दुरुस्ती करून देण्याची मागणी मेडशी येथील सामाजिक कार्यकर्ते जावेद धन्नू भवानीवाले व परिसरतील शेतकरी, शेतमजूर. व वाहन धारक यांच्या कडून होत आहे.
अशा खड्यामुळे झालेल्या रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून रात्रीच्या प्रवासाधर्मीयान खड्ड्याचाअंदाज येत नसल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नही. तसेच शेतीच्या कामासाठी उपयोगी पडणारे वाहन उपयुक्त यंत्र व शेतमजूर याना ने आन करण्यासाठी शेतकरी वर्गाला खूपच त्रासदायक ठरत आहे. तरी जिल्ह्यातील संबंधित रस्ते वाहतूक विभागाने या समस्येकडे विशेष लक्ष केंद्रित करून मेडशी ते मुंगळा या पाच सात कि.मी. अंतर असलेले रस्त्यामधील सर्व खड्डे व्यवस्थित रित्या बुजून रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जावेद धन्नू भवानीवाले, संदीप बहादुरे,उल्हासराव(घुगे) मेडशिकर,नितीन कुदळे,रहीम बागवान या शेतकरी, शेतमजूर,व वाहन धारकांना कडून होत आहे
Social Plugin