Ticker

6/recent/ticker-posts

दोडामार्ग तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर



प्रमोद गवस/प्रतिनिधी

दोडामार्ग, १५:  तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. खालीलप्रमाणे प्रवर्गनिहाय आरक्षण ठरवण्यात आले आहे:

अनुसूचित जाती (महिला) : साटेली भेडशी,

अनुसूचित जाती : तेरवण मेढे,

खुला प्रवर्ग (महिला) : कुडासे, तळकट, कुंब्रल, घोटगेवाडी, झोळंबे, परमे - पणतुर्ली, बोडदे, बोडण, मणेरी, मांगेली, पिकुळे, मोरगाव,

खुला प्रवर्ग : आयनोडे हेवाळे, कळणे, विर्डी, कोनाळ, आयी, उसप, कुडासे खुर्द, केर, झरे -२, फुकेरी, माटणे, सासोली,

ना.म.प्र. (महिला) : घोटगे, मोर्ले, कोलझर, झरेबांबर, पाटये पुनर्वसन सासोली खुर्द,

ना. म. प्र. : वझरे, खोक्रल, आडाळी, आंबडगाव, तळेखोल

या आरक्षणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सर्वसामान्यांसह मागासवर्गीय आणि महिलांना प्रतिनिधित्व मिळणार आहे. एकूणच दोडामार्ग तालुक्यातील या आरक्षणाने  अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे.