अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ
अंबड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या अपघातात,जालन्याहून पाचोडला जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिली,ज्यामुळे ट्रकच्या चाकाखाली दुचाकीस्वार असलेली एक महिला आणि दीड वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. मोटारसायकलवरून जाणारी आणखी एक महिला आणि मोटारसायकलस्वार सुरक्षित राहिले.सोमवारी संध्याकाळी ५:३० वाजता ही दुर्घटना घडली.
पतीच्या वर्षश्राद्ध च्या दिवशी एकुलता एक मुलगा गमावला -सावित्री पवार यांचे पती गेल्या वर्षी कृष्णाने आत्महत्या केली होती.आज त्यांचे पहिले वर्षश्राद्ध होते.त्या वर्षश्राद्धा साठी सावित्री तिच्या माहेरीतुन तिच्या सासरच्या घरी आली होती. वर्षश्राद्धाचा कार्यक्रम संपल्यानंतर ती तिच्या आई आणि एकुलत्या एका मुलासह तिच्या माहेरी परतत होती.त्यादरम्यान हा अपघात झाला आणि सावित्रीने तिच्या डोळ्यासमोर तिचे मूल आणि आई गमावली.
ट्रकच्या मागच्या चाकाखाली चिरडले
पैठण तालुक्यातील दावलवाडी येथील रहिवासी सावित्रा कृष्णा पवार (२४) या तिच्या दीड वर्षाच्या मुलासह अंबड तालुक्यातील दुधपुरी गावात तिच्या पतीच्या पहिल्या वर्षश्राद्धासाठी आल्या होत्या. वर्षश्राद्धाचा कार्यक्रम संपल्यानंतर,सावित्रा तिचा मुलगा विशाल आणि आई गोपिका तिच्या मावशीचा मुलगा लखन प्रकाश गायकवाड (२६) याच्या दुचाकीवरून ट्रिपल सीटवर दावलवाडीला परतत होते.जेव्हा ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचले तेव्हा जालन्याहून पाचोडकडे वळणाऱ्या एका ट्रकने मोटारसायकलला धडक दिली.त्यामुळे मोटारसायकलच्या मागे बसलेले गोपिकाबाई आणि दीड वर्षाचा विशाल खाली पडले.त्यामुळे ते ट्रकच्या मागच्या चाकाखाली चिरडले गेले.कोणालाही काही समजण्यापूर्वीच दोघांचाही जागीच मृत्यू झाला.शहराच्या मध्यवर्ती रस्त्यावर झालेल्या या भीषण अपघातामुळे परिसरात मोठी गर्दी जमली.या घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांनी लोकांची गर्दी पांगवून वाहतूक सुरळीत केली.
Social Plugin