Ticker

6/recent/ticker-posts

अल्पवयीन मुलीचे अपहरण , आरोपीस अटक



नाशिक प्रतिनिधि अमन शेख,

अल्पवयीन मुलीला फुस लाऊन पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्या प्रकरणी घोटी पोलीसांनी संशयिताला अटक करून पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की १३ जुलै रोजी १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची तक्रार संबधित मुलीच्या पालकांनी दिली होती. याची गंभीर दखल घेऊन घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी अज्ञात आरोपीच्या शोधण्यासाठी पोलीस पथके तयार केली होती.

अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीला घेवुन संशयित हा तळ्याची वाडी,( खोडाळा, ता. मोखाडा, जि पालघर )येथे असल्याची गुप्त माहिती पोलिस पथकाला सुत्रांकडून माहीती मिळाली होती. पोलीस उपनिरीक्षक सुरेखा देवरे व पो.हवा. संतोष नागरे, पो.हवा. श्रीकांत खैरे यांनी पालघर जिल्ह्यात जाऊन आरोपी व अल्पवयीन मुलगी यांना ताब्यात घोटी पोलीस ठाण्यात हजर केले.यावेळी अल्पवयीन मुलीस पोलीसांनी विश्वासात घेवुन विचारपुस केली असता आरोपीने अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर बळजबरी अत्याचार केला असल्याचे सांगितल्याने यातील आरोपी दिलीप मोहन वाघ, वय १९ वर्ष, रा. तळ्याची वाडी, खोडाळा, ता. मोखाडा, जि. पालघर यास अटक करण्यात आली.

सदर गुन्ह्यात दिलीप वाघ या संशयित आरोपीवर भान्यासं कलम ६४(२) सह पोस्को कायदा कलम ४,६,८,१२ हे वाढीव कलम लावले असुन सदर गुन्ह्यात संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. सुरेखा देवरे पोहवा संतोष नागरे, पो.हवा. श्रीकांत खैरे हे करीत आहे.