
नाशिक प्रतिनिधि अमन शेख ,
नाशिक शहरातील एका विवाहितेवर तिच्या सासरी अत्याचार व जादूटोण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पती, सासू व नणंद यांनी मिळून तिला घरात डांबून ठेवत एका भोंदूबाबाच्या मदतीने जादूटोणा करत मानसिक व शारीरिक छळ केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.
घटना डिसेंबर २०२४ ते जुलै २०२५ दरम्यान पालघर जिल्ह्यातील वसईमधील उमेळा परिसरात घडली. पीडित महिला सासरी राहत असताना तिला वारंवार त्रास दिला जात होता. तिला घरात कोंडून एका मांत्रिकाला बोलावून तिच्यावर जादूटोण्याचे प्रकार करण्यात आले, असा आरोप तिने नोंदवलेल्या तक्रारीत केला आहे.या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात पती, सासू व नणंद या तिघांविरोधात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Social Plugin