नाशिक प्रतिनिधि अमन शेख ,
इगतपुरी तालुक्यात पंतप्रधान सिंचनयोजनेतून काळूस्ते परिसरात बांधलेल्या भाम व भावली धरण गेल्या वर्षीच्या तुलनेत 100 टक्के लवकर भरून ओव्हरफ्लो झाले. नाशिक जिल्ह्यात पहिल्यांदाच इगतपुरी तालुक्यातील हे दोन धरणे ओसंडून वाहत असल्याने जिल्ह्यात समाधान व्यक्त केले आहे. या धरणातील विधिवत जलपूजन आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते करण्यात आले.
भाम धरण हे सलग पाचव्या वर्षी पूर्ण क्षमतेने भरल्याने समाधान व्यक्त केले. जवळपास अडीच टीएमसी क्षमतेचे हे दोन्ही धरणे आहेत.यावेळी नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, उपविभागीय अभियंता पवन डेडवाल, शाखा अभियंता युवराज महाले, संदीप मते, भरत पारधी , पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव, माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन माळी, माजी सभापती ज्ञानेश्वर लहाणे, प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके, रघुनाथ तोकडे, रमेश जाधव, शेतकरी नेते पांडुरंग शिंदे, युवानेते संजय खातळे, वसंत भोसले आदी उपस्थित होते.
Social Plugin