Ticker

6/recent/ticker-posts

पिकविम्यासंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना- सुदर्शन जाधव



अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ

घनसावंगी तालुक्यात पीक विमा योजनाची जनजागृती आणि मार्गदर्शन राबवले जात आहे.तालुक्यामधील सर्व शेतकरी बांधवांनी खरीप पिक विमा योजना सन २०२५ मध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. प्रधानमंत्री पिकविमा नोंदणी दि ३१ जुलै २०२५ पर्यंत सुरू राहणार आहे.यात सहभाग घेण्यासाठी आपल्या जवळील आपले सरकार सेवा केंद्र,बँक तसेच केंद्र शासनाच्या पोर्टलवर शेतकऱ्यांनी स्वतः नोंदणी करावी अशी माहिती भारतीय कृषी विमा कंपनीचे घनसावंगी तालुका समन्वयक सुदर्शन जाधव यांनी दिली.यावेळी शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.