Ticker

6/recent/ticker-posts

कारंजा ते शेलुबाजार रोडवर पेडगाव फाटा जवळ ट्रक व ट्रॅव्हल्स चा भिषण अपघात .



डॉ.गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी


सविस्तर असे की कारंजा ते शेलुबाजार रोडवर गाव पेडगाव जवळ ट्रक व शिंध  ट्रॅव्हल्स यामध्ये भीषण असा अपघात झाला यावेळी 20 ते 30 प्रवासी जखमी झाल्याची माहिती.अपघाताची माहिती पत्रकार राजेश वानखडे यांनी यांनी श्री गुरु मंदिर  रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांना अपघाताची माहिती देताच त्यांनी भीषण अपघातामुळे कारंजातील सर्व रुग्णवाहिका 108 कारंजा लोकेशन 108 शेलू बाजार 108 मंगरूळपीर जय गुरुदेव समृद्धी रुग्णवाहिका  रुग्णवाहिका शिवनेरी रुग्णवाहिका दादाजी रुग्णवाहिका वेदांत रुग्णवाहिका जय गजानन रुग्णवाहिका जगद्गुरु नरेंद्राचार्य रुग्णवाहिका व सर्व रुग्ण चालक तात्काळ घटनास्थळी जाऊन काही पेशंटला सेलूबाजार येथे हलविण्यात आले ते दहा ते पंधरा पेशंटला कारंजा उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर फासाटे डॉक्टर जाधव सर प्रथम उपचार करून पाच ते सात पेशंटला पुढील उपचारासाठी अकोला अमरावती ते रेफर करण्यात येत आहे. अपघाताची माहिती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत साहेब यांना देण्यात आली आहे.