कवडदरा वार्ताहर : अनिल मल्हारी निसरड
आज सिन्नर मध्ये 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमासंर्भात हुतात्मा स्मारक येथे सहविचार सभा ३ संपन्न झाली त्यास सर्व गटाचे सामाजिक, राजकीय क्षेत्रातील आदिवासी समाज बांधव उपस्थित होते. यावेळी सर्वानुमते सिन्नर शहरात एकच कार्यक्रम आयोजित केला जाणार असल्याचे निश्चित करण्यात आले आहे.
यावेळी क्रांतिवीर भागोजी नाईक यांच्या वंशज अलकाताई पवार,सामाजिक कार्यकर्ते देवराम खेताडे सर, एकलव्य संघटनेचे तालुका अध्यक्ष किरण भाऊ मोरे, आदिवासी युवा फाउंडेशनचे संस्थापक शरद भाऊ लहांगे,आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे ब्रिगेडचे विजय भाऊ मुठे,माजी नगरसेवक रुपेश मुठे, आदिवासी युवा फाउंडेशन चे राज्य अध्यक्ष विठ्ठल भाऊ खोकले, ट्रायबल आर्मीचे संस्थापक अध्यक्ष अमोल भाऊ गवारी,चंद्रपूरचे सरपंच प्रकाश भाऊ मदगे,ठाकर ठाकूर समाज संघटनेचे तालुका अध्यक्ष अजय भाऊ कडाळे,अखिल भारतीय आदिवासी युवा परिषदेचे जिल्हाध्यक्ष सोनुभाऊ मेंगाळ,लक्ष्मण तळपे,क्रांतिवीर भागोजी नाईक फाउंडेशनचे ज्ञानेश्वर भाऊ माळी, सोमनाथ भाऊ मेंगाळ व त्यांचे सहकारी, गणेश भाऊ गुंबाडे, संदीप लहांगे,शरद भाऊ पवार आकाश धोंगडे आदी समाज बांधव उपस्थित होते.
Social Plugin