Ticker

6/recent/ticker-posts

प्रहार संघटनेचा वडीगोद्री येथे शेतकरी कर्जमाफीसाठी रास्ता रोको

 



 अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ 

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी प्रहार जनशक्ती पार्टीचे संस्थापक अध्यक्ष बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वात सबंध महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेस रास्ता रोको करण्यात आले,तसेच सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर वडीगोद्री ता.अंबड जि.जालना येथे मार्केट कमिटीच्या गेट समोर प्रहार जनशक्ती पार्टीचे अंबड तालुका प्रमुख राम ठाकूर व शिवसेना उ बा टा गटाचे तालुकाप्रमुख बाळासाहेब गावडे यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामध्ये परिसरातील विविध पक्षाचे पदाधिकारी, शेतकरी बांधव,कामगार सर्व उपस्थित होते यावेळी मंडळ अधिकारी यांना निवेदन देऊन आंदोलन थांबवण्यात आले व पोलीस प्रशासनाचा चोख  बंदोबस्त त्या ठिकाणी करण्यात आला होता..