Ticker

6/recent/ticker-posts

कर्जमाफीसाठी कारंजात चक्काजाम आंदोलन शासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी



कारंजा (लाड) प्रतिनिधि पराग कु-हे 


कारंजा(लाड) माजी मंत्री बच्चू कडू प्रणित प्रहार जनशक्ती पक्ष व अन्य संघटनाच्या वतीने २४ जुलै रोजी स्थानिक छत्रपती संभाजी महाराज चौकात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या प्रमुख मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख माजी आमदार बच्चू कडू यांनी २४ जुलै रोजी ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला हाक देताना येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष महेश राऊत यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. 

यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे, वेगळा विदर्भ झाला पाहिजे, शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा असा गगनभेदी घोषणा करण्यात आल्या. या आंदोलनात शेतकरी एल्गार समिती जिल्हाध्यक्ष राजू अवताडे, किसान ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गजानन आमदाबादकर, तालुकाध्यक्ष भारत भगत, डॉ. रमेश चंदनशिव, प्रहारचे युवक जिल्हाध्यक्ष अमोल घुले, युवक तालुकाध्यक्ष गजानन करडे, अतुल गायकवाड, ओमप्रकाश तापडिया, विजय ढळे, गौरव जमाले, पंचायत समितीचे माजी सदस्य दिनेश वाडेकर, शुभम बोके, संकेत नाखले, राजीव भेंडे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते