शिरूर ग्रामीण प्रतिनीधी - (शैलेश जाधव)
शिरूरच्या आमदार मा. माऊली कटके व त्यांच्या बंधूंवर करण्यात आलेल्या खोट्या व बदनामीकारक आरोपांनी तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. या निषेधार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिरूर पोलीस स्टेशनवर धडक देत जोरदार घोषणाबाजी केली.
तालुकाध्यक्ष रवींद्र बापू काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व शहराध्यक्ष शरद नाना कालेवार यांच्या नेतृत्वात दिलेल्या निवेदनात संबंधितांवर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.या आंदोलनात युवक अध्यक्ष राहुल रणदिवे, शहर अध्यक्ष एजाज बागवान, कुंडलिक शितोळे, शरद साठे, क्रीडा अध्यक्ष अतुल गव्हाणे, विद्यार्थी नेता अमित गव्हाणे, युवा नेते रंजनभैय्या झांबरे, वसीम शहा, नरेंद्र कदम, तसेच ज्ञानेश्वर कटके फाउंडेशनचे सुनील दादा जाधव व स्वप्नील अण्णा रेड्डी यांच्यासह अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोलीस निरीक्षकांना देण्यात आलेल्या निवेदनात कार्यकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, "दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अन्यथा रस्त्यावर उतरून मोठे जनआंदोलन उभारले जाईल."
सुनील दादा जाधव यांचे भाष्य:"मा. आमदार माऊली कटके हे जनतेसाठी झटणारे, स्वच्छ प्रतिमेचे नेतृत्व आहे. त्यांच्या नावावर खोटे आरोप करणे म्हणजे शिरूरच्या जनतेचा अपमान आहे. आम्ही हे खपवून घेणार नाही. दोषींवर तातडीने गुन्हा दाखल न झाल्यास, आमचा संघर्ष अधिक तीव्र होईल. हा केवळ निषेध नाही, तर कटके कुटुंबियांच्या सन्मानासाठी लढा आहे."*
Social Plugin