Ticker

6/recent/ticker-posts

वाटलूज शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप

 


सतीशकुमार कोकरे (वाटलूज 

श्री.कृष्णानंद राम मारुती विद्याश्रम ,विठ्ठल नगर वाटलूज तालुका दौंड यांच्यावतीने नाना महाराज श्रीगोंदेकर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाटलूज मधील विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप आज दिनांक 23 /07/ 2025 रोजी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच सोलर पॅनलच्या दोन बॅटऱ्या संस्थेमार्फत  देण्यात आल्या.

 याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त संजय प्रधान साहेब ,श्री संतोष सबनीस साहेब आणि मंदार कुलकर्णी साहेब तसेच माजी उपसरपंच नानासो कांबळे ,हरिश्चंद्र शेंडगे ,हेमंत गोफणे ,संभाजी चोरमले , राजेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख महादेव कोपनर साहेब व सर्व शिक्षक उपस्थित होते .

याप्रसंगी इस्रो व नासा भेटीसाठी झालेल्या निवड परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार माननीय संजय प्रधान साहेब यांनी रोख स्वरूपात बक्षीस देऊन केले व शाळेतील अडीअडचणींबाबत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी राजेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री महादेव कोपनर साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले .

कार्यक्रमाचे प्रास्ताविक   मुख्याध्यापक गोरख गायकवाड सर यांनी  केले तर आभार मोहन हगारे सर यांनी मानले. सूत्रसंचालन श्री संजय माळवे सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोपट गार्डी सर यांनी सहकार्य केले.