बिलोली प्रतिनिधी गणेश कदम.
गावातील जिल्हा परिषद शाळा, किशोर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सहकारी सोसायटी व ग्रामपंचायत कार्यालय या सर्व ठिकाणी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. पहाटेपासूनच गावात देशभक्तीपर गीतांच्या सुरावटी घुमत होत्या.सर्वप्रथम जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक व शिक्षकांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. लहानग्या विद्यार्थ्यांनी तोंडभरून ‘वंदे मातरम्’ आणि ‘जन गण मन’ गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, नृत्य, भाषणे, देशप्रेम जागवणारे घोषवाक्य सादर केले.
यानंतर किशोर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आला. प्रमुख पाहुण्यांनी स्वातंत्र्य सेनानींच्या बलिदानाची आठवण करून देत विद्यार्थ्यांना शिक्षण, शिस्त व समाजकार्याचे महत्त्व पटवून दिले.ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच कुसुमताई यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. ग्रामसेवक व उपस्थित मान्यवरांनी गावाच्या प्रगतीसाठी एकजुटीने काम करण्याचा संकल्प व्यक्त केला.सहकारी सोसायटी येथे देखील सहकारी सोसायटी चेअरमन बजरंग बत्तलवाड यांच्या हस्ते ध्वज फडकवून उपस्थितांना देशाच्या प्रगतीत योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले.या सर्व कार्यक्रमांना गावातील नागरिक, पालक, महिला, युवक, शालेय विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्साह, देशप्रेम आणि ऐक्याचे वातावरण अनुभवास मिळाले.





Social Plugin