नांदगाव :- ईसाक शेख
आज जवळकी येथे देशाचा 79 स्वतंत्र दिन उत्सव साजरा करण्यात आला. जवळकी ग्रा. पं. च्या परंगनात सर्व मान्यवरांच्या उपस्थित ध्वज पूजन करून जवळकी गावचे सरपंच श्रीमती अलमीना शेख यांनी ध्वजा रोहन केले.. सामूहिक राष्ट्रगीत पठण करून झेंड्याला सलामी दिली तद नंतर राज्यगीत सुद्धा गायले. ह्यावेळी जवळकी येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.ग्रा. पं. सदस्य जी. प. शाळेचे शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका तसेच ग्रा. पं. कर्मचारी व आजी माजी सदस्य उपस्थित होते.
त्या नंतर जवळकी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेतील प्रांगनात शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश खुटे व फेरोज शेख यांच्या हस्ते ध्वजा रोहाणाचा कार्यक्रम पार पडला. शाळेतील विध्यर्थ्यांनी सामूहिक कवायत केली.ग्रामपंचायत च्या वतीने मुलांना मिठाई वाटप करण्यात आली





Social Plugin