आपला 15 ऑगस्ट — आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन!या पवित्र दिवसानिमित्त अटकळी ग्रामपंचायतीच्या प्रांगणात ध्वजारोहणाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. कुसुमताई बत्तलवाड यांच्या शुभहस्ते आपला तिरंगा फडकवण्यात आला.ध्वजारोहणानंतर सर्वांनी एकत्र येऊन राष्ट्रगीताचे गायन केले, आणि 'भारत माता की जय', 'वंदे मातरम' अशा घोषणांनी वातावरण देशभक्तीने भारून गेले.गावातील मान्यवर, ग्रामपंचायतीचे सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले.
Social Plugin