Ticker

6/recent/ticker-posts

महाबोधी महाविहार मुक्ती जनसंवाद पंचशील धम्म ध्वज यात्रा 19 ॲागस्टला मालेगाव येथे येत आहे.


  

भिक्खू संघाचे स्वागत धम्म देसना*गायक विकास राजा व सुभाष कोठारे यांचा गायन*

मालेगाव प्रतिनिधी:-जावेद धन्नू भवानीवाले

     बुद्धिस्ट समन्वय संघ महाराष्ट्र द्वारा आयोजित महाबोधी महाविहार मुक्तीच्या समर्थनार्थ जनसंवाद पंचशील धम्म ध्वज यात्रा नागपूर येथील पावन दिक्षाभूमीतून 17 ऑगस्ट 2025 पासून निघणार असून 19 ऑगस्ट रोजी शहरात दाखल होत आहे. यावेळी भिक्खू संघाचे सभासद मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहणार असून जेष्ठ भिक्खूंची धम्म देसना होणार आहे.

     महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन तथा बी टी ॲक्ट 1949 रद्द करणे ही मागणी घेऊन ही पंचशील धम्म ध्वज, जनसंवाद यात्रा बोधगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे प्रणेते पूज्य भन्ते विनाचार्य यांच्या प्रमुख नेतृत्वात व कार्यकारी अध्यक्ष अखिल भारतीय बौद्ध महासभा भिमराव यशवंत आंबेडकर यांच्या पाठीब्यांने तसेच प्रामुख्याने पूज्य भन्ते ज्ञानज्योती महाथेरो ताडोबा ,पूज्य भन्ते प्रज्ञापाल वाशीम, पूज्य भन्ते विजयबोधी, पूज्य आर्याजी संघशीला कारंजा लाड पूज्य भन्ते प्रज्ञाशील राजगांव, पूज्य आर्याजी सुमती अमरावती, पूज्य आर्याजी महामाया भंडारा पूज्य भन्ते संघरत्न मुर्तिजापूर आदी भिक्खू संघाच्या उपस्थितीत ही पंचशील धम्म ध्वज यात्रा दीक्षाभूमी ते चैत्यभूमी जात आहे .

    दिनांक 19 ऑगस्ट 2025 सोमवार रोजी दुपारी दोन वाजता मालेगाव शहरातील बालाजी लॉन, शेलू रोड , मालेगाव येथे महाबोधी महाविहार मुक्तीच्या समर्थनार्थ पूज्य भन्ते विनाचार्य हे उपस्थित जनतेशी संवाद साधणार आहेत. येताना सर्वांनी पंचशील धम्म ध्वज सोबत घेऊन पंचशील यात्रेत सहभागी व्हावे ज्यांना वाहनांनी सहभागी व्हायचे त्यांनी आपल्या वाहनावर पंचशील धम्म ध्वज लावून सहभागी होण्याचे आवाहन अखिल भारतीय बौद्ध महासभा व अखिल भारतीय समता सैनिक दल सब डिवीजन मालेगाव यांनी केले असुन मालेगाव येथील आयोजक पंचशील धम्म ध्वज यात्रा स्वागत समितीचे वतीने जे.एस.शिंदे, अनील तायडे, राहूल तायडे व बाळासाहेब सावंत, सुधाकर पखाले यांनी केले आहे.

    *गायक विकास राजा व सुभाष कोठारे यांचे गीत गायन*

         या जनसंवाद पंचशील धम्म ध्वज यात्रेत सहभागी भिक्खू संघाला समता सैनीक दल मानवंदना देणार आहे. तर जनसंवाद यात्रेतील भिक्खू संघाच्या धम्म देसने च्या आधी बुद्ध भीम गीत गायनाचा कार्यक्रम महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक विकास राजा व सुभाष कोठारे यांचा आयोजित केला आहे . नंतर जनसंवाद होणार आहे. तरी या पंचशील धम्म ध्वज जनसंवाद यात्रेत मालेगाव शहरातील व तालुक्यातील तमाम उपासक, उपासिका यांनी आपला पंचरंगी धम्म रश्मी धम्म ध्वज घेऊनच यावे व जनसंवाद यात्रेत येतानां पांढरे शुभ्र कपडे परिधान करून यावे.